ताज्याघडामोडी

इंजिनिअर मुलाच्या हत्येसाठी वडिलांनीच दिली दोन लाखांची सुपारी

इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या हत्येसाठी वडिलांनीच दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना अन्नमया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली. आपल्या मुलाला वाईट सवयी लागली होती आणि तो कुटुंबीयांना त्रास देत होता. यामुळे वडिलांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले. या खुनात त्याच्या मेहुण्यानेही मदत केली होती. 

पोलिसांनी सांगितले की, टागोर नाईक वय २२ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी मृताचे वडील आणि काका यांच्यासह अन्य एका व्यक्तीची ओळख पटली आहे. अन्नमय जिल्ह्यातील तांबलापल्ले मंडळाच्या कुठीकीबांडा थांडा येथील रेड्डेप्पा नायक यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा टागोर नाईक हा चेन्नईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. नुकतेच त्याने घरातून सोन्याचे दागिने घेऊन ते विकले होते. त्या पैशातून त्याने दारू आणि गांजांची हौस भागविली. टागोरला वडील आणि लहान भावाने चोरीबाबत विचारणा केली असता त्याने घरच्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. टागोरपासून आपल्या कुटुंबाला धोका आहे असे वडिलांना नेहमीत वाटायचे. यामुळे त्यांनी टागोरला संपविण्याचा बेत आखला.

वडील रेड्डाप्पा नाईक यांनी बंगळुरू विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे त्यांचे मेहुणे बी. शेखर नाईक यांना ही समस्या सांगितली. मुलाची हत्या केल्यास दोन लाख रुपये देऊ असे सांगून सुपारी म्हणून ५० हजार रुपये रोख दिले. या हत्येसाठी शेखर नाईकने सांबेपल्ले मंडल येथील पेड्डाबिडीकी गावातील जुना गुन्हेगार बी. प्रताप नाईक याच्याशी करार केला. योजनेचा एक भाग म्हणून या दोघांनी यावर्षी २८ जून रोजी टागोर नाईक यांना मदनपल्लेच्या बाहेरील झोपडपट्टीत नेले. तिघांनी दारू प्यायली. टागोरने खूप दारू प्यायली आणि नशाही केली. त्यानंतर टागोरची हत्या केला आणी मृतदेह तेथेच टाकून दिला. 2 जुलै रोजी हत्येच्या ठिकाणाहून दुर्गंधी येत असल्याचे पशुपालकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

सुरुवातीला संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड झाल्याने त्याचे रूपांतर खुनाच्या प्रकरणात झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींची ओळख पटविण्यात आली. या हत्येमध्ये सहभागी असलेले प्रतापनायक वय 23 वर्षे शेखरनायक वय 27 वर्षे आणि मुख्य सूत्रधार असलेले मृताचे वडील रेड्डेप्पानायक वय 40 वर्षे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago