शेतात जाणारी वाट आडवल्याच्या रागातून सख्ख्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील मोढवे गावात घडली आहे.
ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत आरोपी लहान भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायाप्पा मोटे याने आरोपी धाकटा भाऊ रामाला तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके का टाकले अशी विचारणा केली.त्या कारणावरुन दोघांमध्ये जोराचे भांडण झाले.
त्यावेळी रामा मोटे याने मोठा भाऊ तायाप्पा याला शिवीगाळ करुन दमदाटी करत तु या रस्त्याने जायचे नाही. तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला खल्लास करतो, असे म्हणून रामा मोटे याने तायाप्पा सोबत वाद घातला. त्यावेळी रामा आणि तायाप्पा यांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली.रामाने तायाप्पा याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. यामध्ये तायाप्पाचा जागीच मृत्यू झाला.तर रामाच्या पायावर घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…