ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री शिंदे समर्थक आमदाराच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणखी एका व्यक्तीला धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार आणि शिंदे गट प्रतोद भरत गोगावले यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली आहे. भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा धमकीचा फोन पहिला नाहीय. अज्ञात व्यक्तींकडून वारंवार धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे.

“मला गेल्या दोन दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. याशिवाय माझे वडील भरत गोगावले यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे फोन येत आहेत. तुम्ही पक्ष कसा वाढवतात ते आम्ही बघतो, असे धमकी देणारे बोलतात. आम्ही या गोष्टी टाळत होतो. पण वरिष्ठ पोलिसांसोबत बातचित केल्यानंतर त्यांनी तक्रार करण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही तक्रार केली आहे”, अशी प्रतिक्रिया विकास गोगावले यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago