वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१), समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न व लूट करणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी, वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…