ताज्याघडामोडी

लक्ष्मी टाकळी येथील तरुणाचा नारायण चिंचोली नजीक खून

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

जागेचा वाद,इनोव्हातून पाठलाग करीत मोटारसायकलला पाठीमागून धडक 

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील हॉटेल वैभवराज या हॉटेलच्या जागा खाली करून जागा मालकाने मागितली म्हणून या हॉटेलचे चालक परमेश्वर देठे याची दोन मुले रणजीत परमेश्वर देठे व  प्रशांत परमेश्वर देठे,पुतण्या नितीन दिगंबर देठे,हॉटेल कामगार विजय बलभीम कोळेकर यांनी संगनमताने लक्ष्मी टाकळी येथेच राहणारे या हॉटेलचे जागा मालक प्रतापसिह सर्जेराव पाटील यांचा मुलगा रविकांत प्रतापसिह पाटील याचा इनोव्हा या गाडीतून पाठलाग करत पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली नजीक असलेल्या हॉटेल पंचरत्न जवळ मोटरसायकल ला पाठीमागून जोरदार धडक देऊन खून केला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील व इतर स्टाफ यांनी घटनास्थळी पोहोचत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून चौकशी केली असता हा अपघात नसून घातपाताचा संशय आल्याने कसून चौकशी केली असता मयताच्या हालचालीवर लक्ष ठेवून पाठलाग करून खून केला असल्याचे उघड झाले आहे.
मयत रविकांत याचे वडील प्रतापसिह सर्जेराव पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी वरील आरोपीवर १२० ब,३०२,३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

7 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago