फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु
सांगोला : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक पॉलीटेक्नीक सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहे.
या सुविधा केंद्रा मार्फत डिप्लोमा थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया १० जून पासून सुरु झाली असल्याची माहिती पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी दिली. इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणे, फॉर्मची पडताळणी करणे आणि फॉर्म कनफर्म करणे हि प्रक्रिया ८ जुलै पर्यंत करू शकत असून त्यासाठी उत्तम गतीचे १०० एमबीपीएस क्षमता असलेल्या इंटरनेट सुविधेसह सर्व बाबी सज्य आहेत. तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी फॅबटेक पॉलीटेक्नीकला फॅसिलिटी सेंटर क्र.६७५६ केंद्र म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून सतत मान्यता दिलेली आहे.
थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी १२ वि सायन्स ( ग्रुप ए , ग्रुप बी किंवा ए आणि बी ), आयटीआय आणि एमसीवीसी (प्लस २) हे विद्यार्थी पात्र असून ग्रुपची कोणतीही अट नाही तसेच १२ वि मध्ये गणित विषय असणे देखील बंधनकारक नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेट देऊन प्रवेशासाठी नाव नोंदणी करण्याचे व अधिक माहितीसाठी प्रा मोहन लिगाडे (९४०४६७०३९८) व प्रा तन्मय ठोंबरे (८४०८८८८६३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे यांनी केले आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…