निवडणूक आयोग प्रायोगिक तत्वावर ‘रिमोट व्होटिंग’ करता येणे शक्य आहे काय याची तपासणी करत असून त्या संदर्भात एक समिती स्थापन केली जात आहे. देशात अनेक मतदार त्यांच्या मतदारसंघातून मतदान करू शकत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षण, नोकरी निमित्ताने अनेक नागरिक देशात अन्य ठिकाणी राहतात तर फिरते कामगार, कंत्राटी मजूर, ऊस तोडणी कामगार असा मोठा समूह एकाच जागी न राहता देशभर फिरत असतो. निवडणूक काळात या सर्व मतदारांना त्यांचा हक्क आहे त्या स्थानावरून बजावता यावा यासाठी रिमोट व्होटिंगची शक्यता पडताळली जात असल्याचे समजते.
या साठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली जाणार आहे आणि कश्या प्रकारे ही योजना राबविता येईल याची माहिती दिली जाणार आहे. देशभरात सध्या प्रवासी मजुरांचे मॅपिंग करण्याचे काम सुरु असून त्याची मदत रिमोट व्होटिंगचा रोड मॅप म्हणजे आराखडा बनविण्यास होणार आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आहे. त्यात झालेल्या चर्चेनुसार २० ते २५ टक्के मतदार अनेक कारणामुळे त्यांच्या मतदारसंघात राहत नाहीत परिणामी मतदान करू शकत नाहीत. या सर्वाना ते जेथे मुक्कामास आहेत तेथूनच मतदान करण्याची सुविधा देण्याबाबत योजना आखली जात आहे. असंघटीत क्षेत्रातील १० कोटी श्रमिकांची नोंदणी ‘ई श्रम पोर्टल’ वर झाली आहे. सध्या फक्त सैनिक अथवा निवडणूक काळात अन्य जागी ड्युटीवर जावे लागणारे मतदार पोस्टाने मतदान करू शकतात.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…