ताज्याघडामोडी

पतीसोबत अफेअर असल्याचा संशय; पत्नीनं ५ जणांना पैसे देऊन बलात्कार करायला लावला

पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. महिलेचे आपल्या पतीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळे तिनं महिलेवर बलात्कार घडवून आणला. पत्नीनं या सगळ्या घटनेचा व्हिडीओदेखील शूट केला. घटना सायबराबादच्या गच्चीबौलीमध्ये घडली आहे.

आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. त्यामुळे त्या महिलेला धडा शिकवण्यासाठी पत्नीनं ५ जणांना पैसे दिले आणि त्यांना महिलेवर बलात्कार करण्यास सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला गायत्रीसह ६ जणांना अटक केली आहे. गायत्रीच्या कोंडापूर येथील घरातच ५ जणांनी महिलेवर बलात्कार केला. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्रीचा पती श्रीकांत यूपीएससीची तयारी करत होता. याच दरम्यान त्याची ओळख पीडितेशी झाली. पीडिता अनेकदा श्रीकांतला भेटण्यासाठी गायत्रीच्या घरी यायची. ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान पीडिता गायत्रीसोबत तिच्या घरी राहिली. पीडिता आणि आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय गायित्रीला आला. बराच वाद झाला. त्यानंतर महिलेनं गायत्रीचं घर सोडलं.

२६ मे रोजी गायत्रीनं आपल्याला घरी बोलावल्याचा आरोप पीडितेनं केला. पीडिता घरी पोहोचली, तेव्हा गायत्रीनं बोलावलेलं पाच जण तिथे उपस्थित होते. त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. गायत्रीनं याचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोपही पीडितेनं केला. यानंतर पीडितेला धमकी देऊन सोडण्यात आलं. पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी तिला देण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago