ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यांपासून ते ब्राह्मणविरोधी असल्याची टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बहुतेक ब्राह्मण मान्यवरांनी पवार ब्राह्मणविरोधी असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय. शरद पवार ब्राह्मणविरोधी असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली जातात. याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका आणि ब्राह्मण संघटनांचं म्हणणं यावर सखोल चर्चा होईल. या बैठकीला ब्राह्मण महासंघ वगळता इतर संघटना पवारांसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहेत. तसा निरोप त्यांनी शरद पवार यांना कळविला आहे.
गेले काही महिने ज्येष्ठ नेते शरद पवार हे जातीयवादी, ब्राह्मणविरोधी असल्याची टीका सोशल मीडियातून होऊ लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीर सभांमधून शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या उतारवयात त्यांना राष्ट्रवादीने त्रास दिला, असा गंभीर आरोप केला. त्यांच्या गंभीर विधानानंतर हळूहळू बाकीच्याही मान्यवरांनी पवारांवर ब्राह्मणविरोधी असल्याचा शिक्का मारला. ज्येष्ठ सिनेअभिनेते शरद पोंक्षे यांनीही पवार ब्राह्मणांच्याविरोधात असल्याची टीका केली तसेच जातीभेद मिटवण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा, असं ते म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राज्यभरातील ब्राह्मण संघटनांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आलंय.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…