ताज्याघडामोडी

मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने रचला कट, संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा महिलेचा प्रयत्न

प्रियकरा सोबत लग्न करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेने मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा कट रचला. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हा प्रकार समोर आला आहे.

या महिलेने तिच्या 2 मुली आणि त्यांच्या प्रियकरांच्या मदतीने जेवणात विषप्रयोग करून कुटुंबातील इतर चार सदस्यांना ठार मारण्याचा कट रचला होता.

ज्योती (21) आणि अर्चना (20) या मुलींची आई राजकुमारी (45) यांनी कुटुंबावर विष प्रयोग केला. या कटामध्ये ज्योती आणि अर्चनाचे प्रियकर अभिषेक (23) आणि दीपक (22) हे देखील सामील होते.

रविवारी ग्रेटर नोएडा मधील जुनेदपूर गावात पाच आरोपींनी मिळून रात्रीच्या जेवणात विष मिसळले. जेवणातून विष प्राशन केल्यामुळे राजकुमारीचा पती देवेंद्र, त्यांचे दोन भाऊ आणि सासू हे कुटुंबातील चारही सदस्य बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने चारहीजण सुखरूप होते. मात्र यावेळी तपासादरम्यान असे समोर आले की, जेवणात विषबाधा झाली होती.

त्यामुळे दोन पोलिस पथकांना या प्रकरणाच्या चौकशीचे काम सोपविण्यात आले. या घटनेनंतर कुटुंबातील सून, तिच्या दोन मुली आणि त्यांचे दोन प्रियकर हे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. भारतीय दंड संहिता कलम 120B (गुन्हेगारी कट रचणे), 328 (विषाने दुखापत करणे) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago