ताज्याघडामोडी

खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम मिळणार जूनमध्ये

राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सेवानिवृत्तीधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या पगारात रोखीने मिळेल अथवा भविष्य निर्वाह निधीच्या योजनेत जमा होणार आहे. मात्र, निवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये रोखीने देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने सोमवारी घेतला. वित्त विभागाच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे १६ लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सात लाख सेवानिवृत्तीधारकांना मिळणार आहे.

राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचारी, अधिकारी; तसेच सेवानिवृत्तीधारकांना एक जुलै २०२१ रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पगारातील थकबाकीची तिसऱ्या हप्त्याची रक्कम जूनच्या पगारात रोख अथवा भविष्य निर्वाह निधीत जमा करून देण्यात येणार आहे. थकबाकी देण्याच्या या निर्णयाचे सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी स्वागत केले.

राज्य सरकारच्या सेवेतील विविध विभागांतील गट ‘अ’ संवर्गातील अधिकाऱ्यांना तिसऱ्या हप्त्याच्या थकबाकीपोटी ३० ते ४० हजार रुपये, गट ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांना २० ते ३० हजार रुपये, ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांना १० ते १५ हजार रुपये, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आठ ते १० हजार रुपयांच्या थकबाकीची रक्कम मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

योजना कोणासाठी?

राज्य सरकारच्या सेवेत एक नोव्हेंबर २००५पासून भरती झालेल्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू नाही. त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू आहे. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांना थकबाकीची रक्कम रोखीने देण्यात यावी, असे या सरकार निर्णयात म्हटले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व जिल्हा परिषदा, सरकारी अनुदानित शाळा आणि इतर सर्व सरकारी अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago