ताज्याघडामोडी

तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली; औसा येथे पोलीस हवालदार अटकेत

औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 4 मे रोजी सुरुवातीस 5000 रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती पहिला हप्ता 3,000 रुपये,तर दुसरा हप्ता 2,000 रुपये ठरला होता औसा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी लोकसेवक लामतुरे यांनी तक्रारदारांकडून पहिला हप्ता म्हणून 3,000 रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago