उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका घरात लग्नाचे सर्व कार्यक्रम जल्लोषात संपन्न होत होते. रात्री जेवण झाल्यानंतर जयमालाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळीच नववधूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
घरात वधूच्या खोलीतून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर विवाह समारंभासाठी आलेल्या नातेवाईकांनी खोलीत धाव घेतली. यावेळी नातेवाईकांना वधू काजल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
ही घटना झाल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेला आहे. मात्र वधूच्या प्रियकरानेच हि घटना घडवून आणल्याची भीती व्यक्त होत आहे. वधूच्या हत्येमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मुलीचे वडील खुबी राम यांनी सांगितले की, लग्नाचा हार घातल्यानंतर माझी मुलगी खोलीत खुर्चीवर बसली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्ती आला आणि मुलीच्या कपाळावर गोळी झाडून पळून गेला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…