जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे असतानाच, मंत्री गडाख व त्यांचे पुत्र उदयन यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यासंदर्भात सोनई पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी आमच्याकडे अशी क्लिप नसल्याचे सांगितले.
मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मंत्री गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना जीवे मारण्याविषयी त्यात उल्लेख आहे. यासाठी अनधिकृतपणे 21 इस्रायली बनावटीची पिस्तुले आधीच वाटून ठेवल्याचा दावा ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती करीत आहे.
दरम्यान, राजळे यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाल्यानंतर आता ही क्लिप समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, राजळे यांच्यावरील हल्लाप्रकरणाचा तपास आता पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…