महाराष्ट्र पोलीस दलाबाबत या राज्यातील जनता मोठा अभिमान बाळगताना दिसून येते.एकीकडे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र पोलीस दलावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच सर्वसामान्य जनतेचा मात्र महाराष्ट्र पोलीस दलाबाबतचा अभिमान तुसभरही कमी झाला नाही असेच दिसून येते,आणि त्याला कारण आहे अजूनही या पोलीस दलात सर्वसामान्य जनतेला अतिशय आपुलकीची वागणूक देत त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी व कर्मचारी होय.
मात्र असे असले तरी गेल्या वर्षभरापासून राज्यात लाचलुचपत विभागाकडून केलेल्या कारवाईत अगदी dysp दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांपासून ते सामान्य पोलीस कॉन्स्टेबल पर्यत शेकडो कर्मचारी यांच्यावर लाचखोरी प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात पहावयास मिळत आहे.मुंबईतील सौरभ त्रिपाठी नावाचा पोलीस उपायुक्त तर लाचखोरी प्रकरणी अजूनही फरार आहे.या साऱ्या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र पोलीस दलाबाबत अभिमान बाळगणारे पोलीस कर्मचारी आणी सामान्य जनता मात्र अस्वस्थ होत असल्याचे दिसून येते.
काल दिनांक ११ एप्रिल रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे याने खाजगी इसमाच्या माध्यमातुन तक्रारदारास ५० हजार रुपये लाचेची मागणी करीत १५ हजार रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या युनिटने रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी सदर पोलीस निरीक्षक व खाजगी इसम ऋषिकेश पतंगे या दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…