फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये वैदिक मॅथ्स वेबिनार संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी वेदिक मॅथ्स चे वेबिनार आयोजित केले होते अनअकॅडमी तर्फे इयत्ता पहिली ते अकरावी च्या विद्यार्थ्यांसाठी    बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही गणिते सोडविण्यासाठी वैदिक गणिताच्या सोप्या टीप्स सांगितल्या. वेद नावाच्या प्राचीन भारतीय शिकवणीवर आधारित तर्क आणि गणितीय कार्य करणारी प्रणाली म्हणजेच वैदिक गणित होय. कार्यक्षम व शिकण्याची सोपी  पद्धत म्हणजे वैदिक गणित होय विद्यार्थ्यांमध्ये नेहमी अभ्यासक्रमात शर्यत असते . क्षमता असलेले लोकच शर्यत जिंकण्यात सक्षम असतात या वेबिनारमध्ये गणिताविषयी चा दृष्टिकोन बदलून  टाकण्यासाठी, बीजगणितातील प्रश्नांची उत्तर  चुटकीसरशी देण्यासाठी तसेच वैदिक गणिताच्या अभ्यासाने मेंदू सक्षम बनणे इत्यादी अनेक फायदे वैदिक मॅथ्सच्या माध्यमातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना अन‌अकॅडमीच्या समर्पित कौर यांनी  सांगितले. हे वेबिनार दोन सत्रांमध्ये आयोजित केले होते .यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेदिक मॅथ्स टिप्स सांगितल्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाइन  गणिते सोडवले या वेबिनारचे आयोजन प्राचार्य सिकंदर पाटील यांनी केले होते .हे वेबिनार यशस्वी होण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago