ताज्याघडामोडी

११ वर्षीय मुलावर अत्याचार, खळबळजनक घटना समोर

राज्यामध्ये महिलांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत असताना परभणी शहरातील दर्गा रोड येथे रुग्णालयात घेऊन जाण्याच्या बहाण्याने बळजबरीने एका ११ वर्षीय मुलाला सोबत घेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना परभणी शहरात उघडकीस आलीय.

रविवारी (१३ मार्च) रोजी दुपारी सदर प्रकरणी आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी शहरातील दर्गा रोड भागामध्ये अकरा वर्षीय मुलगा खेळत असताना दगड लागून त्याचं डोकं फुटलं. मुलाला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने सय्यद अन्सार सय्यद सईद हा त्याला बळजबरीने दवाखान्यात नेतो म्हणून घेऊन गेला. दवाखान्यात न नेता संबंधिताने या भागातील एका हॉलच्या पाठीमागे नेऊन मुलावर अत्याचार केला.

सदरील माहिती अकरा वर्षीय मुलाने आपल्या घरच्यांना दिल्यानंतर मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी अन्सार सय्यद सईद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली असताना परभणी शहरातील दर्गा रोडवर अकरा वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शरद जर्‍हाड करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago