ताज्याघडामोडी

लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या 4 जागांसाठी 12 एप्रिलला पोटनिवडणूक

लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या 4 जागांसाठी 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यात पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा जागेचा समावेश आहे. ही जागा बाबुल सुप्रियो यांच्यामुळे रिक्त झाली आहे.

गेल्या वर्षी बाबुल सुप्रियो यांनी आपल्या लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.

लोकसभेच्या एका जागेसोबतच बंगालमध्ये एका विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 12 एप्रिलला होणाऱ्या या पोटनिवडणुकीचे निकाल 16 एप्रिलला जाहीर होणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago