‘विठ्ठल’च्या संचालकाच्या पेट्रोल पंपावरून २ हजार लिटर डिझेलची चोरी

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहन कोळेकर यांच्या मालकीच्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथे पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर दिनांक ११ मार्चच्या मध्यरात्रीस डिझेलचे टाकीतुन 1,92,585 रुपये किंमतीचे 2114 लिटर डिझेल चोरुन नेले आहे अशा आशयाची फिर्याद महेश मोहन कोळेकर पंडहरपूर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत दाखल फिर्यादीनूसार महेश कोळेकर यांनी 11/03/2022 रोजी सकाळी 09/00 वाजता पेट्रोलपंपावरील पेट्रोल व डीझेल साठवणुक टाक्यांचा स्टक चेक केला होता.त्यावेळी डीझेल साठवणुक टाकीमघ्ये 15297 लिटर डिझेल शिल्लक होते.त्यानंतर रात्री 09/00 वा. चे सुमारास पेट्रोलपंपावरील हिशोब घेवुन ते घरी गेले.दि.12/03/2022 रोजी सकाळी 09/00 वा.सुमारास पेट्रोलपंपाचे डीझेल साठवणुक टाक्यांचा स्टक चेक केला असता, त्यावेळी डीझेल साठवणुक टाकीमघ्ये 10414 लिटर डिझेल शिल्लक मिळुन आले म्हणुन, डिझेल विक्रीचा हिशोब केला असता 2114 लिटर डिझेल कमी मिळुन आले.पेट्रोलपंपावरील सी.सी.टि.व्ही मघ्ये पाहीले असता रात्रचे 02/00 वाचे सुमारास डीझेल टाकीचे डीप पाईप जवळ कंपाऊडचे पाठीमागुन दोन इसम येवुन संशयास्पद हालचालकरीत असताना दिसुन आले असून शेजारील शेतकरी अर्जुन भिमराव कोळेकर यांचे शेतामध्ये डिझेल सांडलेले दिसुन आले. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द महेश कोळेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.  
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

6 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

1 week ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago