ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “ताण तणाव व्यवस्थापन” याविषयावर व्याख्यान

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथे गुरुवार दिनांक १० मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने “महिलांचे ताण-तणाव व्यवस्थापन” याविषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन सहभागी झालेल्या डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांचे स्वागत निशा करांडे यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये डॉ. शुभांगी कुऱ्हाडे यांनी ताण म्हणजे काय? ताण त्रासदायक की लाभदायक असे वर्गीकरण, ताणाची कारणे व या ताणाचे व्यवस्थापन कसे करावे म्हणजेच ताण कसा दूर करावा याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निशा करांडे यांनी केले. डाॅ. प्रा. वैष्णवी शुभांगी कुऱ्हाडे यांचा परिचय प्रा. वैष्णवी उत्पात यांनी करून दिला. या कार्यक्रमास १०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अंजली पिसे यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago