मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने दुचाकीला जोरदार टक्कर दिली. या अपघातामध्ये तीन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
खटखरी पोलीस स्थानकाचे सब-इन्स्फेक्टर प्रज्ञा पटेल यांनी सांगितले की, तिघे भाऊ दहावीची अंतिम परीक्षा देऊ घरी परतत होते. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वेगवान ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकच्या टायरखाली आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ताज अंसारी, रानू अंसारी आणि इश्मा अंसारी अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून ट्रकही जप्त केला आहे.
महाराष्ट्रात ट्रकने दोघांना चिरडले
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात महामार्गावर एका वेगवान ट्रकने दोन लहान मुलांना उडवले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मोखाडा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. आरोही सोनार आणि पायल वारखडे अशी मृतांची नावे आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…