ताज्याघडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोपीचंद पडळकर पुन्हा मैदानात, आझाद मैदानात पुकारला एल्गार

कालच एसटीचे विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल कोर्टात दिल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती.

सुरूवातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्वात आमदार पडळकर यांनी केलं होतं, परबांच्या या माहितीनंतर आता गोपीचंद पडकर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसह जमत पडळकरांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. पुन्हा आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. त्यामुळे मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संप करणाऱ्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसलाय.

पुन्हा सरकारला मोठं चॅलेंज

सुरुवातीला एसटी कर्मचारी संपात सहभागी होत सरकारला सळो की पळो करुन सोडणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काहीच नसतं’, अशी सरकारची अवस्था असल्याची टीका कालच खोत यांनी केलीय.

तर आज पडळकरांनी थेट एल्गार पुकारला आहे. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा तापताना दिसूत आहे. ऐन अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे. अन्यथा सारे पर्याय खुले आहेत, असा इशारा शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

कर्मचाऱ्यांचं काय नुकसान होणार?

या अहवालात तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

तर या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारलाही यामुळे पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. एसटीचे विलीनीकरण होईल या आशेपायी गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरू आहे. मात्र आता त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago