राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीप्रकरणी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
‘आम्हाला खात्री होती की आज न् उद्या हे घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबद्दल भाष्य करण्याची गरज नाही,’ असेही ते म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, ‘काही झाले तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घेतले जाते. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्याला आता २५ वर्ष झाली.
पुन्हा तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, लोकांना त्रास देणे, सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात आणि तपास यंत्रणांविरोधात भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडले आहे, असे ते म्हणाले.
आज पहाटे ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहचले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर यांच्याशी संबंधित नवाब मलिकांची ईडी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडीकडून कारवाई सुरू आहे. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी नवाब मलिक यांना ईडीने समन्स बजावले होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…