कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी याठिकाणी एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला करून आपल्या जन्मदात्याचा जीव घेतला आहे.पोलिसांनी संशयित तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या बर्गे मळा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर 21 वर्षीय मुलगी साक्षी शांतीनाथ केटकाळे हिने लोखंडी गजाने बापाच्या डोक्यात घाव घातला.
आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने शांतीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वी केटकाळे यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.लेकीनेच बापाची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…