ताज्याघडामोडी

लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या तरुणाने केले आत्मदहन

लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या एका युवकाने आत्मदहन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

महेंद्र नामदेव बेलसरे (27, रा. पळशी खुर्द, ता. खामगाव) असे आत्मदहन करणार्‍या युवकाचे नाव आहे. हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. गुरूवारी पहाटे त्याने स्वत:च्या शेतात सरण रचून पेट्रोलच्या सहाय्याने पेटवून घेतले.

गंभीररित्या भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

निराशेतूनच युवकाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सुत्रांकडून केला जात आहे. याबाबत पळशी खुर्दचे पोलीस पाटील गजानन पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल अंगावर घेऊन युवकाने पेटवून घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago