स्वेरी इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या माघ वारीत देखील पोलीस प्रशासनाला मदत करून जणू पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. विद्यार्थ्यांचे हे सामाजिक कार्य पाहून सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांनी प्रत्यक्ष येऊन स्वेरीच्या विद्यार्थ्यांची पाठ थोपटली आणि विशेष कौतुक केले.
पंढरपूर मध्ये कोरोना कालावधीनंतर प्रथमच माघ वारी समाधानकारक भरली होती. मरगळ झटकून घालवून शेतकरी व वारकरी पंढरी नगरीत पांडुरंगाच्या भेटीला आले होते. यावेळी वारीच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने स्वेरी अभियांत्रिकीला मदतीची हाक दिली होती. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी या दोन्ही महाविद्यालयातील मिळून साधारण ३५ विद्यार्थी सलग पाच दिवस प्रशासनाला सहकार्य करत होते. चारही दिवस पंढरपूर मधील अंबाबाई पटांगण आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या महत्वाच्या ठिकाणी उभारलेल्या पोलीस मदत केंद्रात दररोज तीन टप्यात हे विद्यार्थी वारकऱ्यांना मदत करत होते. विद्यार्थ्यांमधील मदत करण्याचा उत्साह पाहून पोलिसांवरील ताण काही प्रमाणात का होईना कमी झाला. स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त सहभागामुळे पोलीस प्रशासनाला खूप मदत झाल्याची भावना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केली. स्वेरीने स्थापनेपासून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आषाढी वारी असो अथवा कार्तिकी वारी असो पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना मनापासून मदत करण्याचे काम स्वेरीचे विद्यार्थी करत असतात. यंदा देखील प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे राष्ट्रीय सेवायोजनेचे अधिकारी डॉ. महेश मठपती तसेच फार्मसीच्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या अधिकारी प्रा. स्नेहल चाकोरकर यांच्या नेतृत्वाखाली अभियांत्रिकी व फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी सलग चार दिवस भाविकांना माहिती देण्याचे कार्य करत होते. यामध्ये शहरातील मठ, लॉज, धर्मशाळा, रुग्णालये, भोजन व्यवस्था, शहराबाहेर जाणारे विविध रस्ते याचबरोबर, हरवलेली व्यक्ती अथवा चुकलेल्या व्यक्ती यांना उदघोषणेद्वारे नातेवाईकांच्या स्वाधीन करणे, आदी वारी संबंधित महत्वपूर्ण कामे स्वेरीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी केले. यामध्ये अक्षय माने, प्रशांत लांडगे, संतोष खिलारे, सुनिल कारंडे, शंकर नरळे, गोरक्षनाथ शेजाळ, आदित्य काशीद, उमेश मदने, महेश देशमुख, सुहास गाढवे, ओंकार बाबर, तृप्ती सोनार, सोनल निकम, शेफाली गड्डम, दीप्ती कदम, तेजश्री डोंगरे, कोमल धुमाळ, मोहिनी जमदाडे, धनश्री मस्के, ज्ञानेश्वरी माळी, सुप्रिया खेडकर, अखिलेश कुटे, अजिंक्य लोखंडे, गणेश तोडकर, अनिकेत बनसोडे, आकाश सुडके, विशाल लिंगडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम करून प्रशासनाला सहकार्य केले. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण पवार, निर्भया पथकाचे प्रमुख पो.उ.नि. प्रशांत भागवत हे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी सौ. कुसुम क्षीरसागर, प्रसाद औटी, अरबाज खाटिक, अविनाश रोडगे, निलेश कांबळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांनीही स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. प्रशासनाला बहुमोल मदत केल्याबद्धल स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील व प्रा. यशपाल खेडकर यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…