ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार? संभाजीराजे मोठ्या घोषणेच्या तयारीत

खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सभाजीराजे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते. राज्यभरातील अनेकांना भेटून त्यांनी चर्चा केली.

विशेष म्हणजे त्याआधी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर राज्यभरात फिरुन त्यांनी समाजातील विविध घटकांशी चर्चा केली. या सर्व घडामोडींनंतर संभाजीराजेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाबाबत ते उद्या खुलासा करणार आहेत.

संभाजीराजे यांनी ट्विटकरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संभाजीराजे आंदोलनाची घोषणा करणार की काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

“मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करुन मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे. याबाबत उद्या 14 फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे”, असं संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago