ताज्याघडामोडी

विष प्राशन करून एकमेकांना मारली मिठी, त्याच अवस्थेत दीर-भावजयीचा तडफडून मृत्यू

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्याच चुलत दिरासोबत भयावह स्थितीत आढळला आहे. दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर करमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोघांचेही मृतदेह रुग्णालयात पाठवले.

पण याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत दोघांनाही मृत घोषित केलं आहे. या घटनेची नोंद करमाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

काकासाहेब बबन कदम (32) आणि सत्यभामा अशोक कदम (27) असं मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही बदनापूर तालुक्यातील राळे येथील हिवरा परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सत्यभामा या आठ दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बहिणीकडे गोलटगाव याठिकाणी आल्या होत्या. तेव्हापासून त्या बहिणीसह बेपत्ता होत्या.

दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला पण सत्यभामा सापडत नव्हत्या. अखेर शुक्रवारी सत्यभामा आणि त्यांचा चुलत दीर काकासाहेब यांचा करमाड याठिकाणी मृतदेह आढळला आहे. दोघांनीही विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचं उघड झालं आहे. दोघांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारल्याच्या अवस्थेत आढळून आले आहेत. स्थानिक नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती करमाड पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेत, दोघांनाही चिखलठाणा येथील मिनी घाटीमध्ये दाखल केलं. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केलं आहे.

त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आली नाही. पण प्रेम प्रकरणातून त्यांनी आपलं जीवन संपवलं असावं, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास करमाड पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago