ताज्याघडामोडी

प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, मुलीच्या कुटुबियांनी थेट मुलाला जिवंत जाळलं

प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडलीय.

ब्रेकअपनंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेतील सदर युवक 50 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या 31 वर्षीय युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्याचं तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच विरोधातून त्यांच्यात ब्रेकअप झाला.

गोरखने ब्रेकअपनंतर त्याची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र तिच्या कुटुंबियांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. पण गोरखला ही बाब खटकली. त्याने मुलीचं लग्न जिथे जमेल तिथे ते लग्न तो मोडत सुटला.

याच गोष्टीचा राग मनात धरुन मुलीचे आई-वडील, भाऊ यांनी आज दुपारी बारा वाजता देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरख बच्छाव या तरुणाला मारहाण केली. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी देवळा पोलिसांनी संबंधित मुलीसह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago