ताज्याघडामोडी

प्रेयसीच्या मागण्या संपत नव्हत्या म्हणून तिलाच संपवलं; फिरायला घेऊन जात केली हत्या

महिनाभरापूर्वी मुंबईतील सांताक्रूझ येथून बेपत्ता झालेल्या 29 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी विले पार्लेतून तिच्या प्रियकराला आणि एका साथीदाराला अटक केली आहे. आरोपी प्रियकराला अटक केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून प्रेयसी सतत महागडे गिफ्ट्स आणि फिरायला घेऊन जाण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे तिची हत्या केल्याचं आरोपीनं सांगितलं आहे. आरोपीला सध्या पालघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता असं हत्या झालेल्या 29 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर झिको अंसलिम मिस्कित असं अटक केलेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या कुमार नावाच्या मित्राला देखील ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पिंकी 24 डिसेंबर रोजी सांताक्रूझ येथून बेपत्ता झाली होती.

त्या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून सांताक्रूझ पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष 9 अधिकारी या गुन्ह्याचा तपास करत होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

7 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago