ताज्याघडामोडी

पेटलेल्या अवस्थेत महिलेची गच्चीवरून उडी; रुग्णालयात उपचार सुरु

नगर शहरातील तारकपूर भागात सोमवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. पेटलेल्या अवस्थेत एका महिलेने घराच्या गच्चीवरून उडी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पूजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे या महिलेचे नाव आहे. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे यांच्या डोक्याला मार लागला आहे. भाजल्याने जखमाही झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र चुग यांनी पेटवून का घेतले? याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

तारकपूर भागातील एका घरावरून पूजा यांना पेटलेल्या अवस्थेत खाली पडताना अनेकांनी पाहिले. त्यावेळी त्या जोरजोरात ओरडत होत्या, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. गजबजलेल्या तारकपूर भागात भर दुपारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस अधिक तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago