बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून 2 मित्रांनी त्यांच्या मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
हे तिन्ही मित्र बिअर पीत बसले होते. मात्र अजून बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राकडे पैसे मागितले. मात्र त्याने पैसे देण्यास नकार देताच त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर इतर दोघांनी एक बिअरची बॉटल फोडली व ती शाहरुखच्या पोटात खुपसली. त्यानंतर ते त्याला तेथून टाकून पळून गेले. काही स्थानिक लोकांनी शाहरुखला रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली असल्याची माहिती बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…