ताज्याघडामोडी

नवऱ्याने फेकली नवरीवर वरमाला, संतापलेल्या नवरीचा लग्नाला नकार

उत्तर प्रदेशमधील औरिया जिल्ह्यात एका लग्नादरम्यान विचित्र प्रकार घडला. नवऱ्याने वरमाला नवरीवर फेकल्याने संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले आहे. कुटुंबीयांनी नवरीला समजवायचा बराच प्रयत्न केला मात्र ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.

औरिया जिल्ह्यातील नवीन बस्ती भागात आकाश व रसिका (नवरीचे नाव बदलले आहे) यांचे लग्न होणार होते. लग्नाच्या विधी सुरू असताना आकाशने मस्करीत रसिकावर वरमाला फेकली.

मात्र भर मांडवात आपल्यासोबत घडलेला प्रकार नवरीला सहन झाला नाही. तिने ती वरमाला बाजूला ठेवत तेथून थेट खोलीत निघून गेली. त्यानंतर रसिकाचे आई वडिल व नातेवाईक तिला मांडवात परत आणायला गेले तेव्हा तिने लग्न करण्यास नकार दिला.

घरातल्यांनी बरीच समजूत काढूनही रसिका ऐकली नाही. ती लग्नाला तयार होत नसल्याने आकाशला तसेच घरी परतावे लागले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago