ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची बच्चू कडू यांची सूचना

मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना केल्या आहेत. 10 आणि 12 वी च्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत केली.

शालेय विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांच्या काळात अभ्यास आणि लिखाणाचा सराव झालेला नसल्यामुळे ही मागणी केली जात होती. लिखाणाचा विद्यार्थ्यांचा सराव सुटल्यामुळे त्यांना परीक्षेत अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच राज्यात सध्या शाळांबाबत ऑनलाइन-ऑफलाईनचा जो काही घोळ सुरू आहे, त्यामुळे देखील विद्यार्थी संभ्रमात आहेत.

म्हणून मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत केल्या. या ऑनलाईन बैठकीला शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago