दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. त्या कारणावरून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी तिचे अपहरण केले. याबाबत पतीने पोलिसात तक्रार दिली आहे.
हरमन जाहगीड, फिर्यादी यांच्या पत्नीच्या काकांचा मुलगा, तीन महिला आणि दोन अज्ञात व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अपहरण झालेल्या विवाहितेच्या पतीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा त्यांच्या पत्नीशी प्रेमविवाह झाला आहे. मात्र या विवाहाला पत्नीच्या माहेरच्या लोकांचा विरोध आहे. पत्नीच्या माहेरच्या लोकांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फोन करून फिर्यादी यांच्या पत्नीला भेटण्यासाठी बाहेर रस्त्यावर बोलविले.
त्यामुळे फिर्यादी, त्यांची पत्नी आणि आई हे तिघेजण रस्त्यावर आले. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पत्नीच्या आई-वडिल आणि इतर नातेवाइकांनी पत्नीचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…