ताज्याघडामोडी

प्रेमाचे गोड गोड मेसेज पाठवून ही तरुणी कमावते लाखो रुपये!

एखाद्या कामाचा भरपूर मोबदला हवा असेल तर त्यासाठी पुष्कळ मेहनत करावी लागते. पण, जर कुणाला फक्त प्रेमाचे मेसेज पाठवून महिन्याला दीड लाख रुपये मिळत असतील तर? हे काम करणारी एक तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

तिने एक व्हिडीओ प्रसारित करत आपल्या या अनोख्या कमाईच्या साधनाचा उल्लेख केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार गेली तीन वर्षं तिने याच मार्गाने पैसे कमावले. तिला फक्त प्रेमळ मेसेज पाठवावे लागत असत. त्या बदल्यात तिला घसघशीत रक्कम मिळत होती.

या तरुणीचं नाव बेली हंटर असं आहे. बेली ही अमेरिकेची रहिवासी आहे. ती तीन वर्षांपूर्वी बफेलो वाईल्ड विंग्ज नावाच्या एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. त्यावेळी तिथे एक मोठ्या वयाचा माणूस एका तरुणीसोबत जेवायला आला होता. बेलीने त्याला जेवण वाढलं. त्यानंतर या जेवणाचं बिल दिलं तेव्हा 2900 रुपयांच्या बिलावर त्याने 7400 रुपये इतकी टिप बेलीला दिली. त्यासोबत आपलं कार्ड देखील बेलीला दिलं.

त्या कार्डावरील क्रमांकावर बेलीने आभार मानण्यासाठी मेसेज केला, तेव्हा त्या माणसाने तिला पुन्हा एकदा जेवण वाढण्याविषयी विचारलं. त्यानंतर बेली आणि त्याचं बोलणं वरचेवर होऊ लागलं.

तिच्या म्हणण्याप्रमाणे तो अतिशय सभ्यपणे आणि मर्यादा राखून बोलत असे. असे गोड गोड मेसेज पाठवण्यासाठी तो तिला भरघोस रक्कम देत असे. जवळपास तीन वर्षं हे सगळं सुरू होतं. त्या पैशांनी आपण खूप खरेदी केली, असं तिचं म्हणणं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago