कोडोली (ता. पन्हाळा) येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व असोसिएशन ऑफ कम्युनिटी फार्मासिस्ट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्वेरी फार्मसीच्या राजश्री मकरध्वज मुळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
‘सोशल अँड कम्युनिटी फार्मसी‘ या विषयावर या राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या राजश्री मकरध्वज मुळे यांच्यासह स्वेरीच्या इतर विद्यार्थिनींनी देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये राज्यातून जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून स्वेरी फार्मसीच्या राजश्री मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तसेच स्वेरी फार्मसीच्याच प्रेरणा लोकरे, आश्विनी लोकरे, निर्जला पाटील, यशश्री यादव, कोमल खरात, स्नेहल पाटील, आश्विनी यादव, श्रद्धा माने, आरती मेटकरी व रुपाली राऊत या दहा विद्यार्थीनींनी देखील सहभाग घेतला. त्यांना प्राचार्य डॉ. मिथुन मणियार व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेतील विजेत्या राजश्री मुळे यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रु. ३ हजार बक्षीस देण्यात आले तर सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी राजश्री मुळे यांच्यासह सहभागी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…