राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत शाळा बंद ठेवण्याचे फर्मान काढले.वास्तविक पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय घाईगडबडीत व राज्याच्या ठराविक भागातील परिस्थिती लक्षात घेत संपूर्ण राज्यावर लादला आहे.एकीकडे हॉटेल,परमिटरूम,विविध मॉल,मंदिरे आदी गर्दीचे ठिकाणी सुरु असताना केवळ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषद असो अथवा नगर पालिका शाळा या ठिकाणी शिकणारे बहुतांश गोरगरीब विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित रहात असून ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसलेले आहेत.तरी तातडीने हा निर्णय मागे घेत शाळा पूर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने शासनाकडे तहसीलदार पंढरपूर यांच्या माध्यमातून निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तोरणे,ताःअध्यक्षःविकास गायकवाड शहराचे राजाभाऊ शिंदे,रवी सर्वगोड ताःउपाध्यक्ष गणेश बाबर कपिल बनसोडे लिंगेश्वर सरवदे ताःसचिवःअमोल चंदनशिवे *ताःसंघटक सुनिल दंदाडे कट्टर समर्थक आदःबाळासाहेब आंबेडकर दीपक सोनवले शहराचेःनवनाथ {पिंटू} मोरे सतीश सातपुते रवी {लालबहाद्दूर }वाळके बंटी परचंडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…