कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होते. कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्याबदल्यात १५०० रुपये घेत असे.
पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रँच युनिट दहाच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर मशीन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर थैमान घालतोय. त्यामध्ये लसीकरण करणे हे फार आवश्यक आहे. यातच अनेक जण याचा फायदा घेत, गैरप्रकार करत असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले आहे. त्यामध्ये मुंबईत देखील अशा प्रकारे बनावट covid-19 लस देणारी टोळी पोलिसांनी पकडली. आरोपी अनेक कंपन्यांचे लसीकरण झाल्याचा सर्टिफिकेट देत होते. हे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…