फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये सुजाण पालकत्व याविषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी सुजाण पालकत्वाची ऑनलाईन  कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून अहमदाबाद , (गुजरात) येथील सौ. सुनयना पलसुले मॅडम होत्या. सुनयना मॅडमने सुजाण पालकत्वाची संकल्पना सोदाहरण समजून सांगितली. बालकाच्या प्रत्येक वयोगटात पालकांनी जागृत असणे गरजेचे असते. पाल्य सोळा वर्षाचा होईपर्यंत पालकांची मोठी जबाबदारी असते. बालक हा नेहमी प्रतिभासंपन्न असतो त्याची जाणीव पालकांना पालक या नात्याने होणे गरजेचे असते. पाल्य 16 वर्षाचा होईपर्यंत आई-वडिलांनी पाल्याचा सखा म्हणून भूमिका बजवावी. तसेच पालकांचे मुख्य कौशल्य बालकातील छुपे गुण बाहेर काढून त्याला पैलू पाडणे होय. त्याचप्रमाणे आजच्या काळाची गरज म्हणजेच एकत्र कुटुंबपद्धती आजी-आजोबांचे संस्कार,पण बदलत्या कुटुंब प्रणालीमुळे पालकत्वाचे रूप बदलत चाललेले आहे. अशावेळी या संक्रमण काळात पालकत्वाची कला व शास्त्र अवगत असणे गरजेचे आहे . पालक म्हणून आपण कमी पडत नाही ना?  तसेच मुलांच्या शैक्षणिक, भावनिक,मानसिक अशा अनेक समस्या व चांगले पालक कसे व्हायचे, बालक-पालक सुसंवाद कसा साधायचा अशा अनेक विषयांवर  सुनयना मॅडमने पालकांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी पालकांनीही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन उपस्थिती दर्शविली आणि सुनयना मॅडमला अनेक प्रश्न विचारून शंकेचे समाधान केले. हा कार्यक्रम संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री दिनेश रूपनर यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर‌ श्री संजय अदाटे व प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रशालेच्या शिक्षिका कुमारी मृणाल राऊत यांनी केले. तर आभार सौ विद्या खाडे  यांनी मानले .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago