ताज्याघडामोडी

आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी

राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे सांगत राजन साळवी यांना धमकी देण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने पत्र लिहून साळवी यांना धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत. असल्या फुसक्या धमक्यांन ते घाबरणारे नाहीत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत,’ असे ते म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago