गुन्हे विश्व

मर्डरचा बदला डबल मर्डरने,गुंडाबरोबर त्याच्या बापाचीही हत्या

लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याची  हल्लखोरांनी गोळीबार करत हत्या केली होती.या  खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली.

त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार शिंदे (वय ५५, रा. लोणीकंद) अशी मृतांची नावे आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती.या खून प्रकरणी सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती.मात्र पुढे तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता.  बुधवारी रात्री त्याच्या कारमधून तो आणि त्याचे वडील लोणीकंद येथून शिंदे वस्ती कडे निघाले होते. त्यावेळी सफारी कारमधून पाच ते सहाजण आले.
त्यांनी सनी शिंदे याला अडवलं. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार सुरू केले.यावेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर देखील वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago