सरगम चौकात तरुण मोटार सायकलवरून उतरला,कार मध्ये बसत केले विषारी औषध प्राशन

पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सदफर तरुणास पोलिसांनी तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजते.
  बाबत मिळालेल्या माहिती नुसार सदर तरुणाची पत्नी हि कौटुंबिक वादामुळे माहेरी आली होती.पत्नी नांदावयास येत नसल्याने चार महिन्याच्या मुलीस पती घेऊनगेला आहे,तो मुलीचे काहीतरी बरेवाईट करेल अशी तक्रार सदर महिलेने आपतकालीन डायल ११२ वरून केली होती.यावेळी कर्तव्यावर असलेले करकंब पोलीस ठाण्याचे पो.ना.बापूसाहेब मोरे,पोसई अजित मोरे, पो हे. काँ. हरीहर, पो.ना. गिरमकर, पो.ना. वाघमारे,पो.ना.कांबळे व सदर तक्रारदार महिला आणि तिचा भाऊ असे आरोपीचे लोकेशन च्या आधारे लहान मुलीचा व आरोपीचा अनवली फाटा, गोपाळपूर, व पंढरपूर शहरात लोकेशनच्या आधारे शोध घेत असताना सरगम चौक येथे आले असता आरोपी व त्याचे बरोबर एक इसम असे दोघेजण नितीन याचे मोटार सायकलवर होते.ती मोटार सायकल व त्यावरील तरुणास पत्नीने ओळखले असता सदर तरुण मोटार सायकलवरून उतरला व पुढील बाजूस असलेल्या स्विफ्ट कारमधून जाऊन बसत त्याने विषारी औषध प्राशन केले आहे.
पोलिसांनी तात्काळ त्या तरुणास लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असून पत्नी नांदायला येत नाही म्हणून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या तरुणा विरोधात भादवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
                                                 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago