मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप पदाधिकारी जितेन गजारीया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांकडून गजारिया यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
जितेन गजारीया हे भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जितेन गजारीयाला ताब्यात घेतले आहे. गजारीया यांनी आक्षेपार्ह ट्विट का केले? तसेच यामागचा उद्देश काय आहे? याबाबत गजारीयाची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.
रश्मी ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गजारीया यांनी याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीतही आक्षेपार्ह लिखाण केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीससुद्धा बजावली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…