यमाई तलाव राज्य शासनाच्या मालकीचा

तहसीलदारांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र 

पंढरपूर शहराच्या सौदर्यात भर घालणारा व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात  शहरी लोकवस्तीत असलेल्या एकमेव विशाल तलाव म्हणून यशवंतराव चव्हाण तलाव तथा यमाई तलाव परिसर ओळखला जातो.जवळपास पावणेदोनशे एकर इतक्या विस्तीर्ण तलाव सध्या पाण्याने तुडूंब भरला आहे.या तलावाच्या ठिकाणी सरोवर सर्वधन विकास योजनेअर्तगत विविध विकास कामासाठी सन २००८ मध्ये सुमारे ६ कोटी रुपयांच्या विकास योजनेस मंजुरी देण्यात आली होती.या पैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णही झाले आहे.या ठिकाणी वर्षातून केवळ तीन महिने तेही विशेष परवानगी काढून मासेमारी करण्यात यावी अशी अट त्यावेळी शासनाने घातलेली होती.पंढरपूर नगर पालिकेकडून दोन महिन्यापूर्वी सदर तलावाच्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.   

       या निविदेबाबत कार्यवाही अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असतानाच तहसीलदार सुशील बेलेकर यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवत यमाई तलाव हा नगर पालिका,जलसंधारण विभाग,किंवा मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या अखत्यारीत येत नसून यमाई तलावाच्या ठिकाणी मासेमारीचा ठेका मंजूर करण्याचा अधिकार नगर पालिकेस नाही असे या पत्रात नमूद केले आहे.     

या बाबत माहिती घेण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.     

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago