एकीकडे राज्यात कोरोनाने प्रचंड आर्थिक संकटात सापडलेली जनता विजेचे बिल भरताना मेटाकुटीस आली आहे,वीजबिलाचे हप्ते पाडून मिळत असले तरी या पोटी आकारले जाणारे व्याज बँकेच्या चौपट आहे.राज्याचे ऊर्जामंत्री वीज भरावेच लागेल म्हणून ठणकावून सांगत आहे,महावितरन वरील कर्जाचे आकडे वाचून दाखवत आहेत,काही ठिकाणी वरिष्ठांचा आदेश मानून वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारही खावा लागत आहे.तरीही महावितरण कंपनी आर्थिक डबघाईतून बाहेर पडली पाहिजे या हेतूने काही प्रामाणिक कर्मचारी काम करत असतानाच काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी आपल्या तुंबड्या भरून घेत असल्याचे दिसून येते.
असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आला असून ३ जानेवारी रोजी लाचलुचपत विभाग यांच्या वतीने जेऊर सेक्शन येथे करण्यात आलेल्या कारवाईत एका हॉटेल चालकास दर महा वीज बिल कमी येण्याची व्यवस्था उपकार्यकारी अभियंता यांना सांगून करून देतो असे सांगत ७० हजाराच्या लाचेची मागणी केली व तडजोडी अंती शिवलीला भेळ सेंटर पंढरीपूल येथे लाच स्वीकारताना बाळासाहेब टीमकरे व सहाय्यक यास रंगेहाथ पडकण्यात आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…