लग्नापूर्वी हुंड्याची मागणी करणाऱ्या एका नवरदेवाची भरमंडपातच धुलाई करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथली असल्याचं सांगितलं जात आहे.
या नवरदेवाचं नाव मुजम्मिल हुसैन असं आहे. त्याचा निकाह 12 डिसेंबर रोजी होणार होता. त्याची वरात लग्नस्थळी पोहोचली. पण, मुजम्मिल आणि त्याचे वडील मेहमूद हुसैन या दोघांनी निकाह होण्यापूर्वी वधुपित्याकडे एक अट ठेवली.
या अटीनुसार, वधुपित्याने त्याला दहा लाख रुपये रोख हुंडा म्हणून देणं अपेक्षित होतं. अन्यथा हा निकाह होणार नाही, असं मुजम्मिलने जाहीर केलं. वधुपक्षाने आधीच त्याला तीन लाख रुपये रोख आणि एक लाख रुपयांची हिऱ्यांची अंगठी दिली होती. आता अजून ही रक्कम कशी उभी करायची हा प्रश्न त्यांना पडला.
पण, दरम्यान त्यांना काही वऱ्हाडींनी हे पिता-पुत्र ठग असल्याचं सांगितलं. अशाच प्रकारे या दोघांनी आधीही अनेक लग्नं केली असल्याची माहिती वधुपक्षाला कळली. अशाच प्रकारे तो आता या मुलीलाही फसवत होता. ते ऐकून वधुपक्षाचा पारा चढला.
त्यांनी मुजम्मिलला घेरून त्याची धुलाई करायला सुरुवात केली. वऱ्हाडींपैकी कुणीतरी त्याचा व्हिडीओ देखील काढला. लग्नाचं रुपांतर हाणामारीत झालेलं पाहून काही वऱ्हाडींनी काढता पाय घेतला. दरम्यान, कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी धाव घेत हे प्रकरण शांत केलं. पोलिसांनी मुजम्मिलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…