मनसेला मोठा धक्का !

मनसेच्या डॅशिंग, फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी कळवलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्या पक्षात नाराज होत्या. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात, अशी तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. या सगळ्या प्रकरणानंतर त्या मनसेला जय महाराष्ट्र ठोकणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे.

अनेक दिवसांपासून त्या मनसेत नाराज होत्या, तेव्हापासूनच त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. अखेर तो अंदाज खरा ठरलाय. शुक्रवारी त्या आपल्या मनगटावनर घड्याळ बांधून राजकारणातली आपली नवी इनिंग सुरु करतील.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago