ताज्याघडामोडी

वडिलांना पराभूत करून मुलगा झाला सरपंच

वडिलांविरुद्ध निवडणूक लढवून सरपंच होण्याचा मान एका मुलाला मिळाला आहे. बिहारच्या गोपालगंज येथील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच हा अभूतपूर्व सामना रंगलेला पाहायला मिळाला.

गोपालगंजच्या माधोपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये संतोष कुमार हा उमेदवार सरपंच पदावर निवडून आला आहे. संतोष हा सध्याचे सरपंच विजय प्रसाद यांचा लहान मुलगा आहे.

संतोष याच्या म्हणण्यानुसार, तो गेला कित्येक काळ वडिलांसोबत गावचा विकासाची कामं करत आहे. तसंच आपल्या वडिलांना कामात सर्वतोपरी साहाय्य देखील करत आहे. पण, गेल्या काही काळापासून विजय प्रसाद हे त्यांच्या मोठ्या मुलाच्या आहारी गेल्यामुळे काम करू शकत नाहीत. त्यामुळे आपण निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला, असं त्याचं म्हणणं आहे.

त्याने निवडणुकीत वडिलांविरुद्ध उमेदवार म्हणून उभं राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तो या निवडणुकीत निवडूनही आला आहे. ही निवडणूक अत्यंत रोमांचक झाली. या निवडणुकीत वडिलांना पराभूत करून तो सरपंच पदावर नियुक्त झाला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago