ताज्याघडामोडी

ओव्हरटेक केल्याच्या रागातून चाकूहल्ला, पोलिसांमुळे वाचला जीव

अगदी सिनेमांतील एखादा सीन वाटावा अशी घटना कल्याण पूर्वे येथे घडली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या 3 पोलिसांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत चाकू हल्ल्यातून दोघा जणांचे प्राण वाचवले आहेत.

पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने हल्लेंखोरांच्या तावडीतून दोघांना वाचवलं आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मयूर रामदास दराडे असे असून जखमी तरुणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी प्रवीण देवरे, उत्तम खरात आणि कुणाल परदेशी हे काटेमानिवली नाका ते चिचंपाडा रोडवर कर्तव्य बजावत होते. या भागात ज्या दुकानदारांनी सीसीटीव्ही लावले नाहीl. त्यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी संबधित पोलिस दुकानदारांना भेटून आवाहन करत होते.  यावेळी त्यांना काटेमानेवली ते चिंचपाडा रोडवर गर्दी दिसून आली.

त्यावेळी तिघांनी पुढे जाऊन पाहिले असता एक इसम हातात चाकू घेऊन दोन जणांवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच तिन्ही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफीने आरोपीच्या हातून चाकू काढत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

ओव्हरटेक करण्यावरुन वाद

आरोपीचे नाव मयूर रामदास दराडे असून हल्ला झालेल्या तरुणांची नावे विशाल पाटील आणि दिपेश रसाळ अशी आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा वाद ओव्हरटेक करण्याच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

यावेळी मयूरने दोघांसोबत वाद घालत चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. दरम्यान संबधित पोलिसांच्या सतर्कतेसह धाडसामुळे त्यांचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कौतुक केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago